नवी दिल्ली : नवी दिल्ली हे ई-रेशन कार्ड सेवा देणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी या ई-रेशन कार्ड सेवेचा शुभारंभ केला. रेशन कार्ड आणि आधार कार्डशी जोडणाऱ्या या नव्या योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीच्या लाभार्थींचा आता सरकारी वेब पोर्टलवरून हे ई-रेशन कार्ड आॅनलाईन मिळू शकेल.या सेवेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्याची व व्यवस्थेत पारदर्शकता येण्याची शक्यता आहे. याशुभारंभ करताना केजरीवाल म्हणाले, ‘ई-रेशन कार्डमुळे संबंधित अन्न पुरवठा अधिकाऱ्याने अन्न सुरक्षा पुरविणारा अर्ज मंजूर केल्याबरोबर अर्ज व रेशन कार्ड मंजूर झाल्याचा संदेश लाभार्र्थींच्या मोबाईल फोनवर मिळेल. त्यानंतर लाभार्र्थींना विभागाच्या वेबसाईटवर रेशन कार्ड नंबर, मोबाईलवरील पासवर्ड व अन्य माहिती टाकावी लागेल व त्यानंतर त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील ई-रेशन कार्ड मिळू शकेल. (वृत्तसंस्था)
दिल्लीत ई-रेशन कार्ड सेवा सुरू
By admin | Published: March 29, 2015 1:20 AM