शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

ई-रिक्षामुळे कोट्यवधी लोकांचे भविष्य बदलेल

By admin | Published: March 14, 2015 1:53 AM

तसेच न्यायालयाच्या बंदीमुळे उपजीविकेच्या समस्येने त्रस्त ई-रिक्षा चालकांचे जीवनही पूर्वपदावर येईल, अशी ग्वाही केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेले मोटार वाहन दुरुस्ती विधेयक ऐतिहासिक असून, यामुळे लाखो गरीब बेरोजगारांना रोजगार मिळेल. तसेच न्यायालयाच्या बंदीमुळे उपजीविकेच्या समस्येने त्रस्त ई-रिक्षा चालकांचे जीवनही पूर्वपदावर येईल, अशी ग्वाही केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली. यावर्षी ७ जानेवारीला मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीसाठी राष्ट्रपतींनी वटहुकूम काढला होता. त्याचे रुपांतर कायद्यात करणाऱ्या विधेयकाला ३ मार्चला लोकसभेत आणि ११ मार्चला राज्यसभेत मंजुरी देण्यात आली. या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गडकरी यांनी सांगितले की, मोटर वाहन कायद्यातील दुरुस्तीमुळे गरीबांचे जीवनमान उंचावण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेलाही वेग येणार आहे. कारण ई-रिक्षाची निर्मिती आता भारतातच होऊ लागली आहे. यापूर्वी ते चीनमधून आयात करावे लागत होते. मनुष्याला मनुष्याचे ओझे वाहून उपजीविका करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, देशात सुमारे एक कोटीवर लोक सायकल रिक्षा चालवितात. ही अमानवीय प्रथा बंद झाली पाहिजे. कमी वयात सायकल रिक्षा चालविणे सुरू केल्यास क्षयरोग आणि कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तसेच संबंधित व्यक्तीचे आयुर्मानही कमी होते, हे एक सत्य आहे. ई-रिक्षाला हिरवा झेंडा दाखविण्याचा संसदेचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारक आहे. टोल प्लाझावर थांब्यामुळे ८८ हजार कोटींचे नुकसान१ मार्चपासून आम्ही ई-टोल सुरू केला आहे. मुंबई ते दिल्ली मार्गावर जाणारे ट्रक आणि अन्य वाहनांना १८ टोलवर थांबावे लागते. प्रत्येक टोलवर १० मिनिटे गृहित धरता १८० मिनिटांचा वेळ जातो. टोलवर थांबावे लागत असल्यामुळे ७ हजार कोटी रुपयांच्या पेट्रोल- डिझेलचे नुकसान होते. एकूण नुकसान ८८ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे आयआयएम कोलकाता आणि ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन आॅफ इंडियाने आपल्या अहवालात म्हटले होते. मी ७५ टोल रद्द केले आहेत. छोट्या टोलनाक्यांना संपुष्टात आणले. आणखी ६० टोल रद्द करण्याचा विचार आहे. ३५० टोलपैकी २०० टोल ई-टोलमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. टोल रूपांतरणासाठी ९०० कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याची माहिती आमच्या विभागाने दिली आहे, असे गडकरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)