नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या ‘इलेक्ट्रॉनिक टोलवसुली’ (ईटीसी)ला येत्या ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त मिळाला आहे. त्या दिवसापासून राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व ३७० टोल नाक्यांवर प्रवाशांना वाहन न थांबविता, ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी) टॅगच्या साह्याने टोल भरता येईल.ही योजना सक्तीची नसून, इच्छा असलेल्यांनी ती मिळेल. सुरुवातीस टोल प्लाझांवर दोन लेन टॅगसाठी असतील. इतर लेनमध्ये सध्याप्रमाणे टोल भरता येईल. आधी मुंबई-अहमदाबाद व मुंबई-आग्रा महामार्गांवरील काही टोल प्लाझांवर लेनमध्ये अशी व्यवस्था होती. आता सर्व टोल प्लाझांवर दोन लेनमध्ये ‘ई-टोल’ असेल. सर्वच टोल प्लाझांमध्ये ही तांत्रिक यंत्रणा असून, प्रतिसाद पाहून सर्व टोलवसुली अशीच करण्याचा विचार होईल.हे ‘फास्ट टॅग’ म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रीय महामार्गांवर ये-जा करणाºया ४० लाख वाहनांपैकी ६.२० लाख वाहनांना असे टॅग आहेत. ही संख्या मार्चपर्यंत १५ लाखांवर नेण्याचे लक्ष्य आहे. या ‘फास्ट टॅग’साठी रक्कम आधीच जमा करावी लागेल. टॅग पुढच्या काचेवर लावला की, वाहन टोल प्लाझावर इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे जमा रकमेतून टोलची रक्कम वळती होईल. वाहन थांबवावे लागणार नाही. जमा रक्कम संपल्यावर टॅग रिचार्ज करता येईल. टॅग टोलनाके वा ठरावीक बँकांमध्ये विकत मिळतील.>एकमेव व्यवस्थाटोलनाक्यांचा कंत्राटदार वेगळा असला, तरी देशभर एकच टॅग चालेल. हा टॅग ‘इंटरआॅपरेबल’ असेल व त्यातून जमा होणारा टोल संबंधित कंत्राटदाराच्या खात्यात जमा होईल. अमेरिका व युरोपमध्येही ही व्यवस्था आहे, परंतु तेथे शहर व महामार्ग यांसाठी वेगळे टॅग लागतात. भारतात ही व्यवस्था यशस्वी झाल्यास, ते जगातील एकमेव उदाहरण ठरेल.
३१ आॅक्टोबरपासून राष्ट्रीय महामार्गांवर ‘ई-टोल’, न थांबता भरा टोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:06 AM