हैदराबाद : चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर पेट्रोल पंपांवर कॅशलेस व्यवहारासाठी डेबिट कार्ड व मोबाइल, ई-वॉलेटचा वापर करण्याचा सरकारचा जोरदार आग्रह असला तरी कार्ड स्वाइप करताना तुम्ही अत्यंत धोका स्वीकारत आहात एवढे लक्षात असू द्या. पेट्रोल पंपांवर मोबाइल फोन वापरणे धोक्याचे असून, तशा सूचनाही तेथे ठळकपणे लिहिलेल्या असतात. त्यामुळे मोबाइल वा ई-वॉलेटचा कॅशलेस व्यवहारांसाठी वापर करण्याच्या सरकारच्या आग्रहाची समाजमाध्यमांतून जोरदार थट्टा केली जात आहे. पेट्रोल पंप हे ‘नो मोबाइल झोन्स’ जाहीर असताना आता मात्र ते कॅशलेस व्यवहारांसाठी गर्दीचे ठिकाण बनले आहे व तेथे लाखो रुपयांचे व्यवहार रोज होत आहेत. पेट्रोल पंपांवर नोटाबंदीच्या निर्णयानंतर पीओएस, मोबाइल व ई-वॉलेट्सचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला असल्यामुळे त्यांचा तेथील वापर बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहनही त्यात करण्यात आले आहे.मोबाइल वापरण्यावर आहेत कठोर निर्बंध स्फोटके, पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेच्या मुख्य नियंत्रकांनी पेट्रोलियम मंत्रालय आणि नैसर्गिक वायू महामंडळाला पाठविलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, १९ डिसेंबरच्या आमच्या आदेशात स्पष्टपणे असे म्हटले आहे की वाहनांत इंधन भरताना पेट्रोल पंपांवर पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशीन, मोबाइल, ई-वॉलेट्सचा वापर करण्यावर कठोर निर्बंध आहेत आणि पेट्रोल पंपांवर धोकादायक भाग (झोन -१) स्पष्टपणे दाखविण्याचा आदेश दिला आहे.झोन-वन असा निश्चित करण्यात आला आहे. तो १.२ मीटर्स तळापासून वर उभा व सर्व दिशांनी ४५ सेंटिमीटर्स पसरलेला असावा. ही बाब नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अॅथॉरिटीचे माजी उपाध्यक्ष एम. शशिधर रेड्डी यांनी २४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ सचिवांच्या लक्षात आणून दिली.
पंपांवर ई-वॉलेट्स धोक्याचे
By admin | Published: December 26, 2016 1:18 AM