भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पाकिस्तान आणि चीनमधील संबंधांबाबत फटकारलं. 'सीमेवरील परिस्थिती दोन्ही देशांमधील संबंध ठरवेल, जोपर्यंत सीमेवरील दहशतवादात कोणताही बदल होत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी संबंध चांगले होणार नाहीत. तसेच चीन संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले, आजही सीमेवर परिस्थिती सामान्य नाही.
चीनचेच जैविक शस्त्र होते कोरोना! आखला होता मोठा प्लॅन; वुहानच्या संशोधकानं केला बडा खुलासा
दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, भारताचे चीनसोबतचे संबंध सध्या चांगले नाहीत. कोणत्याही नात्याचा धागा त्यांच्या भावनेवर उभा असतो. त्या नात्यात आदर असायला हवा. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर आमचे संबंध बिघडले. जोपर्यंत तेथे शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत संबंध सुधारणार नाहीत.
एस जयशंकर हे चीनबाबत पहिल्यांदाच बोलत नाहीत. याआधीही ते अनेकदा बोलले आहेत.'जेव्हा सीमेवर परिस्थिती चांगली असेल तेव्हाच चीनशी संबंध मधुर होतील. जयशंकर यांनी चीन-पाकिस्तान व्यतिरिक्त भारताच्या रशिया आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांवर चर्चा केली. ते म्हणाले की, अमेरिकेसोबत आमचे संबंध खूप चांगले आहेत.