ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.13 - देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. पण आता या वादाला नवे वळण मिळणार असल्याचे जाणवते आहे.
खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरुन यापूर्वीही महात्मा गांधी यांचा फोटो काढण्यात आला होता. 1996, 2002, 2005, 2011,2012, 2013 आणि 2016 या वर्षी निघालेल्या कॅलेंडरवर महात्मा गांधींजींचा फोटो नव्हता. केव्हीआयसीनं हे स्पष्टीकरण दिलं असलं तरी या वर्षांमध्ये कॅलेंडरमध्ये कोणाचे फोटो होते, याबाबत मात्र गोंधळ कायम आहे. असा कोणताच नियम नाही की कॅलेंडरवर महात्मा गांधीजींचाच फोटो असावा. गांधीजींचा फोटो ऐवजी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला हे म्हणने पुर्णपणे चुकीचं आहे. अशी प्रतिक्रिया खादी व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.
काँग्रेसच्या 50 वर्षांच्या काळामध्ये खादीची विक्री दोन ते सात टक्क्यांपर्यंत होती तिच विक्री मागच्या दोन वर्षांमध्ये 34 टक्क्यांपर्यंत गेल्याचंही केव्हीआयसीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.