काही महिन्यापूर्वी दिल्लीत नव्या संसदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संसदेत सेंगोल बसवण्यात आले. सेंगोलला विरोधी पक्षांनी विरोध केला होता. यावेळी तमिळनाडूतील डिएमकेनेही विरोध केला होता. उदयनिधी यांनीही विरोध केला होता. पण, आता त्यांचा हातात 'सेंगोल' असल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकचे हे मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, उदयनिधी यांच्या हातात सेंगोल असल्याचे दिसत आहे.
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
द्रमुकच्या युथ विंगचे उपसचिव जोएल यांनी उदयनिधी यांना ही भेट दिली आहे. यामुळे आता या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे. संसदेत सेंगोल स्थापन करत असताना अनेक राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला होता. निदर्शने करणाऱ्यांमध्ये तामिळनाडूचा द्रमुकचाही समावेश होता.
संसदेत सेंगोलची स्थापना झाली तेव्हा सपा, द्रमुकसह अनेक राजकीय पक्षांनी त्याला राजेशाहीचे प्रतीक म्हणून विरोध केला होता. द्रमुकनेही याला विरोध केला होता आणि लोकशाहीत संविधानावर चर्चा व्हायला हवी असे म्हटले होते. पण सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक आहे. सेंगोलला संसदेतून काढून टाकण्याची मागणीही अनेक पक्षांनी केली होती.
सेंगोल हा संस्कृत शब्द "संकु" पासून आला आहे, याचा अर्थ "शंख" आहे. हिंदू धर्मात शंख ही एक पवित्र वस्तू होती आणि ती बहुधा सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून वापरली जात असे. राजदंड हे भारतीय सम्राटाच्या सामर्थ्याचे आणि अधिकाराचे प्रतीक होते. हे सोन्याचे किंवा चांदीचे बनलेले होते आणि बहुधा मौल्यवान दगडांनी सजवलेले होते. सेंगोल राजदंड सम्राट औपचारिक प्रसंगी घेऊन जात असे आणि त्याचा अधिकार दर्शवण्यासाठी वापरला जात असे. सेंगोल हे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीकही मानले जाते.
संसदेत सेंगोल स्थापन करत असताना आधी उदयनिधी यांनी जोरदार विरोध केला होता. आता त्यांचाच सेंगोल सोबत एक फोटो व्हायरल झाला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात आऱोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.