शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

कॅन्सल तिकिटांतून करोडोंची कमाई; रेल्वेला ३ वर्षांत वेटिंग लिस्ट तिकिटाद्वारे मिळाले १,२२९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 1:44 PM

रद्द केल्या जाणाऱ्या तिकिटावर रेल्वेकडून कॅन्सलेशन शुल्क आकारले जाते, त्यातून हा पैसा रेल्वेला मिळतो.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारला सर्वाधिक महसूल देणाऱ्या विभागात समावेश असलेल्या रेल्वेला तिकिटे विकून उत्पन्न मिळते, हे तर सर्वच जाणतात; पण विकलेली तिकिटे रद्द केल्यानंतरही रेल्वेला कोट्यवधी रुपयांची कमाई होते, याची फारशी कोणाला माहिती नसते. रद्द केल्या जाणाऱ्या तिकिटावर रेल्वेकडून कॅन्सलेशन शुल्क आकारले जाते, त्यातून हा पैसा रेल्वेला मिळतो.

मध्य प्रदेशचे माहिती अधिकार कार्यकर्ता विवेक पांडे यांनी दाखल केलेल्या एका माहिती अधिकार अर्जावर रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ ते २०२४ या कालावधीत कॅन्सल वेटिंग लिस्टच्या तिकिटाद्वारे रेल्वेला १,२२९ कोटी रुपये मिळाले. याद्वारे मिळणारे उत्पन्न दरवर्षी वाढत चालले आहे.  प्रवासी सोयीसाठी तिकिटे रद्द करतात, परंतु यातून रेल्वेचा फायदा होतो.

दिवाळीच्या काळात मिळाले १० कोटी

  1. गेल्या वर्षी ५ ते १७ नोव्हेंबर २०२३ या दिवाळीच्या सप्ताहात ९६.१८ लाख तिकिटे रद्द करण्यात आली. त्यातून रेल्वेला १०.३७ कोटी रुपये मिळाले. या काळात मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. 
  2. आरएसी/वेटिंग लिस्टचे तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला ६० रुपये शुल्क लागते. एसी फर्स्ट क्लास/ एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट रद्द करण्यासाठी सर्वाधिक २४० रुपये शुल्क लागते. 
  •   वर्ष        रद्द तिकिटे         कमाई
  • २०२१      २.५३ कोटी      २४२.६८ कोटी 
  • २०२२      ४.६ कोटी        ४३९ कोटी 
  • २०२३     ५.३६ कोटी      ५०५ कोटी  
  • २०२४*    ४५.८६ लाख    ४३ कोटी
टॅग्स :railwayरेल्वे