नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या संकटात दिल्लीत रविवारी संध्याकाळी दिल्ली शहर आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. परंतु आज पुन्हा दिल्लीत भूंकापाचे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकीकडे संपूर्ण देश कोरोना सारख्या संकटाविरुद्ध लढत असताना आज दुसऱ्यांदा दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या २४ तासांमध्ये दुसऱ्यांदा दिल्ली हादरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज झालेल्या भूकंपाची २.७ रिश्टर स्केल एवढी होती.
दिल्ली आणि एनसीआरमध्ये रविवार सायंकाळी ५.५० च्या सुमारास देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. तसेच दिल्लीजवळ असलेल्या नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम या परिसरात देखील भूकंपाचे धक्के बसल्याचे समोर आले होते. या भूकंपामुळे घाबरलेले लोक घराबाहेर निघाले तर काहीजण गॅलरीत उभे राहिले. रविवारी झालेल्या भूकंपाचा हा धक्का ३.५ रिश्टर स्केल इतका होता असं सांगण्यात आले होते.