हैदराबाद : नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इंस्टिट्यूट(एनजीआरआय) च्या वैज्ञानिकांनी तुर्कीसारखा भूकंप भारतातही येण्याची शक्यता वर्तविली आहे. उत्तराखंडमध्ये तुर्कीसारखाच भूकंप येणार असल्याचा इशारा सेस्मॉलॉजीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पूर्णचंद्र राव यांनी दिला आहे.
उत्तराखंडमध्ये हा भूकंप कधी येईल याची तारीख आणि वेळेची भविष्यवाणी करू शकत नाही. परंतू उत्तराखंडच्या खाली मोठ्या प्रमाणावर दाब तयार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा दबाव जेव्हा सुटेल तेव्हा भूकंप येणे पक्के आहे. भूकंपाची तीव्रता ही भौगोलिक क्षेत्रावर अवलंबून असेल, असे ते म्हणाले.
उत्तराखंडवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही हिमालयीन प्रदेशात सुमारे 80 भूकंप स्थानके निर्माण केली आहेत. आम्ही रिअल टाइम स्थितीचे निरीक्षण करू शकतो. आमच्या डेटानुसार हा दबाव बऱ्याच काळापासून निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.
या भागात अनेक जीपीएस नेटवर्क आहेत. जीपीएस पॉइंट्स पृष्ठभागाच्या खाली होत असलेल्या बदलाचे संकेत देत आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली काय घडत आहे याचा तपास करण्यासाठी व्हेरिओमेट्रिक जीपीएस डेटा प्रोसेसिंग पद्धत ही विश्वसनिय आहे. त्यानुसारच आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही अचूक वेळ आणि तारीख सांगू शकत नाही परंतु उत्तराखंडमध्ये कधीही मोठा भूकंप होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Turkey's Earthquake: तुर्कीसारखा भूकंप भारतात झाला तर? 13 राज्यांवर घोंघावतेय संकट; महाराष्ट्राचा हा भाग डेंजर झोनमध्ये८ किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपाला मोठा भूकंप म्हणतात. तुर्कीचा भूकंप त्याहून कमी तीव्रतेचा होता, परंतू नुकसानी ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. निकृष्ट दर्जाच्या बांधकामासारख्या अनेक कारणांमुळे तिथे मोठ्या प्रमाणात हाणी झाली आहे. शास्त्रज्ञांनुसार हिमालयीन क्षेत्रात ८ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो.