Earthquake News : गेल्या महिन्यात टर्कीमध्ये भीषण भूकंप आला होता. त्या भूकंपात हजारो लोक मरण पावले आणि तेवढेच लोक जखमीही झाले. त्या भूकंपात इतका मोठा विनाश झाला की, देश पुन्हा उभा करायला काही वर्षे लागतील. दरम्यान, मंगळवारची रात्र भारतासह जगातील अनेक देशांसाठी दहशतीची ठरली. दिल्ली-एनसीआरसह भारतातील अनेक राज्यांमध्ये 6.6 रिश्टर स्केल भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील फैजाबादपासून 133 किमी आग्नेयेला होता.
6.6 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे पाकिस्तानात एक इमारत कोसळली. यात 11 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी झाले आहेत. पण आता भारतावरही मोठे संकट येणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, गेल्या 38 दिवसांत भारतात 10 वेळा भूकंपाचे झटके जाणवले आहेत. कालचा भूकंप या 38 दिवसांतील सर्वात शक्तिशाली होता. भूकंप तज्ञांच्या मते भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे क्षेत्र आहे. हे धोक्याचे क्षेत्र गुजरात, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, मणिपूर, नागालँड, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये आहेत.
गेल्या 38 दिवसांत कुठे-कुठे भूकंप झाला?12 फेब्रुवारी रोजी सिक्कीममधील मंगनमध्ये भूकंप आला होता. त्याची तीव्रता 4.0 होती.16 फेब्रुवारीला पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र बांगलादेशातील सिल्हेट येथे होते. तीव्रता 4.3 रिश्टर स्केल.22 फेब्रुवारीला पृथ्वी पुन्हा हादरली, त्याचे केंद्र नेपाळमधील जुमला येथे होते. तीव्रता 4.8रिश्टर स्केल.24 फेब्रुवारीला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र शेजारील देश पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होते. तीव्रता 4.12 मार्च रोजी नेपाळमधील लोबुज्या या पूर्वेकडील भागात भूकंपाचे धक्के जाणवले, भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. तीव्रता 4.03 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशात भूकंप झाला. तीव्रता 4.17 मार्च रोजी अंदमान आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के बसले. तीव्रता 4.98 मार्च रोजी पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पृथ्वी हादरली. तीव्रता 4.012 मार्च रोजी मणिपूरच्या वांगजिंगमध्ये भूकंप झाला. तीव्रता 4.8
भारतात 5 भूकंप झोन आहेत.झोन 1 - पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ओडिशाचा काही भाग.झोन 2 – तामिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि मध्य प्रदेशचे काही भाग.झोन 3 - केरळ, बिहार, पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम राजस्थान, पूर्व गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भाग.झोन 4 - मुंबई, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, पश्चिम गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार-नेपाळ सीमा क्षेत्रझोन 5- काश्मीर खोरे, पश्चिम हिमाचल, पूर्व उत्तराखंड, गुजरातचे कच्छ, उत्तर बिहार, सर्व ईशान्य राज्ये, अंदमान आणि निकोबार बेटे.