ऑनलाइन लोकमत
इंफाळ, दि. 24 - मणीपूर आज संध्याकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. रिश्टर स्केलवर 5.2 इतकी तीव्रता या भूकंपाची मोजण्यात
आली.
संध्याकाळी 5 वाजून 32 मिनीटांनी भूकंपाचा धक्का बसला. चुराचंद्रपूर जिल्ह्यात जमिनीपासून 20 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अजूनपर्यंत नाही.
यापुर्वी पहाटे 3 वाजून 9 मिनीटांनी सिक्कीमलाही भूकंपाचा धक्का बसला होता. रिश्टर स्केलवर 3.5 तीव्रतेचा हा भूकंप होता.