Delhi Earthquake Updates : दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. बुधवारी (११ सप्टेंबर) दिल्लीसह शेजारी राज्यातही धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्र पाकिस्तानमध्ये होता. इस्लामाबाद आणि लाहोरही भूकंपाचे झटक्यांनी हादरले. 5.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप होता.
दोन आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानी दिल्ली भूकंपच्या धक्यांनी हादरली. पाकिस्तानात केंद्रबिंदु असलेल्या भूकंपाचे धक्के दिल्लीबरोबर उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही जाणवले आहेत.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. मात्र, यात कोणतीही जीवित वा मालमत्तांची हानी झालेली नाही.
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजी म्हटले आहे की, दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी पाकिस्तानात भूकंपाचे धक्क जाणवले.