ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - नवी दिल्ली आणि उत्तर भारताचा काही भाग आज पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरला. पहाटे ४.३० च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल होती.
भल्या पहाटे अनेकांनी टि्वट करुन या भूकंपाची माहिती दिली. इमारतींना हादरे जाणवले तसेच झोपेतून जागे करायला हा भूकंपाचा धक्का पुरेसा होता असे अनेकांनी टि्वट केले आहे.
दिल्ली, एनसीआर आणि शेजारच्या भागांमध्ये हे धक्के जाणवले. या भूकंपामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.