आज पुन्हा दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.5 रिश्टर स्केल इतकी होती असं सांगण्यात येत आहे. याआधीही दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याच भागात मंगळवारी रात्री 9.30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नवी दिल्लीचा पश्चिम भाग भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने अनेकांना त्याचा अंदाज आला नाही.
येत्या काही वर्षांत मोठा भूकंप होण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात एक भीती कायम आहे. एकाच महिन्यात दोनवेळा झालेल्या धक्क्यामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, यापूर्वी दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. एकाच आठवड्यात दिल्ली आणि आजुबाजूच्या परिसरातील भूकंपाची ही दुसरी घटना होती. या भूकंपाची तीव्रता 5.4 रिक्श्टर स्केल एवढी नोंद करण्यात आली होती. यावेळीही भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच होता. भूकंपाचा आवाज आल्यानंतर लोकांनी घरातून आणि उंच उंच इमारतीतून बाहेर पलायन केल्याचं पाहायला मिळालं. या घटनांमुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे.