ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - दिल्लीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयागमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवण्यात आला आहे. सोमवारी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. मसुरी, सहारनपूर, गाझियाबाद, चंदिगढ, ऋषिकेश आणि डेहराडूनलाही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. या भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. जमिनीच्या 33 किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर उतरले असून, दिल्लीतल्या रस्त्यांवर लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे. डेहराडूनमध्ये भूकंप बराच वेळ जाणवल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली आहेत. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागालाही या भूकंपाचे धक्के बसले आहेत.
पंजाबमध्ये भूकंप जाणवला असून, यात कोणतीही वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भूकंपानं कच्च्या दुकानांना धोका संभवण्याची शक्यता भूगर्भ वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. भूकंपानंतर आता सौम्य धक्के बसण्याची शक्यता आहे. मात्र भूकंपाची तीव्रता कमी असल्याचा अंदाज भूगर्भ वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. एनडीआरएफनं हाय अलर्ट जारी केलं असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भूकंपाचा अहवाल मागवला आहे.
Union Home Minister Rajnath Singh asks for detailed report on earthquake, NDRF put on high alert— ANI (@ANI_news) February 6, 2017
Epicentre of earthquake measuring 5.8 magnitude on Richter Scale was in Rudraprayag of Uttarakhand: IMD— ANI (@ANI_news) February 6, 2017
Earthquake tremors felt in Uttarakhand, people evacuated their buildings. Locals say tremors were strong,led to chaos(Visuals from Haldwani) pic.twitter.com/oS35MHn6HD— ANI (@ANI_news) February 6, 2017
Earthquake tremors felt in Uttarakhand, people evacuated their buildings (Visuals from Dehradun) pic.twitter.com/WIiDo5wJz9— ANI (@ANI_news) February 6, 2017