नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या संकटात दिल्लीत रविवारी संध्याकाळी शहर आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं अनेक लोक घराच्या बाहेर पडले होते. दिल्लीसह गाजियाबाद येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरातही भूकंपाचा धक्का जाणवला. जवळपास ५ सेकंद लोकांनी भूकंपाचे धक्के अनुभवले. भूकंपाचा केंद्र बिंदू दिल्ली आणि यूपी होता. तर याची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. यापूर्वी 20 डिसेंबर 2019 रोजी दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. सुरुवातीच्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मात्र, भूकंपाच्या धक्क्यानंतर लोक भीतीने घरातून बाहेर आले.