भूकंपामुळे दिल्लीतील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी झालेल्या भूकंपाचे धक्केताजे असताना आज पुन्हा बुधवारी पुन्हा दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, आज बुधवारी भूकंपाचे धक्के तीव्र नव्हते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता २.७ इतकी मोजली आहे.
कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक, तयारीचा घेणार आढावा
बुधवारी दुपारी ४.४२ वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये २.७ रिश्टर स्केलचे सौम्य धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरमध्ये मोठा हादरा बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा भूकंप आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपामुळे प्रभावित झालेले ठिकाण पश्चिम दिल्ली आहे.
दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह उत्तर भारतातील काही भागांमध्ये मंगळवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के काही सेकंद जाणवले, त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. भूकंपाच्या धक्क्यांनंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर लगेचच जम्मू प्रदेशातील काही भागात मोबाईल सेवा विस्कळीत झाली. उत्तरकाशी आणि चमोलीसह उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले.