लाेकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील बेराेजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली हाेती. मात्र, आता लाट ओसरू लागताच परिस्थितीत सुधारणा हाेत आहे. बेराेजगारीचा दर ८.७ टक्क्यांपर्यंत घटला आहे. गेल्या दीड महिन्यातील हा नीचांकी दर आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे व्यापार आणि उद्याेग-धंदे सुरू हाेत आहेत. बाजारात मागणीही वाढू लागली आहे. राेजगार मिळू लागल्यामुळे लाेकांच्या हातात पैसा येईल. परिणामी आर्थिक चक्र वेगाने फिरू लागेल, अशी अपेक्षा आहे.
आता उद्योग-धंदे सुरू होत असून, त्यामुळे लोकांना पुन्हा रोजगार मिळू लागला आहे. बाजारात मागणी वाढू लागल्याने उत्पादनही वाढत आहे. रोजगारांमुळे लोकांच्या हातात पैसा येईल आणि तो बाजारात आल्यास आर्थिक चक्र अधिक वेगाने फिरू लागेल, असे दिसत आहे.
कडक निर्बंध किंवा लाॅकडाऊनमुळे बेराेजगारीमध्ये माेठी वाढ झाली हाेती. एप्रिलमध्ये सुमारे ७३.५ लाख जणांचे राेजगार गेले हाेते. ‘सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार मे महिन्यात राष्ट्रीय बेराेजगारीचा दर १२ टक्के हाेता. शहरी बेराेजगारीचा दर १४.७ टक्क्यांपर्यंत वाढला हाेता. ताे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घटून ९.७ टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण बेराेजगारीचा दरही मे महिन्यातील १०.६३ टक्क्यांच्या तुलनेत ८.२३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
२.३काेटी राेजगार दुसऱ्या लाटेने हिरावले या वर्षी जानेवारीमध्ये बेराेजगारीचा दर ६.५२ टक्क्यांपर्यंत घटला हाेता. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल आणि मे महिन्यात पुन्हा राेजगार निर्मितीला धक्का बसला. या दाेन महिन्यांच्या कालावधीत तब्बल २.३ काेटी लाेक बेराेजगार झाले हाेते.