शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कुजबूज कुंकळ्ळी पालिकेच्या सोप्

By admin | Published: August 11, 2015 10:23 PM

कुंकळ्ळी पालिकेच्या सोपोचे पैसे कुणाच्या खिशात ?

कुंकळ्ळी पालिकेच्या सोपोचे पैसे कुणाच्या खिशात ?
कुंकळ्ळी पालिका अनेक वेळा आर्थिक गैर व्यवहारासाठी बदनाम झालेली आहे. आता पालिकेच्या सोपो कराचेही गणित जुळत नसल्यामुळे हा कर पालिकेच्या तिजोरीत जातो की कुणाच्या खिशात याबाबत कुंकळ्ळीत कुजबुज सुरू झालेली आहे. पालिकेने बाजारात बसणार्‍या लहान विक्रेत्यासाठी सोपो गोळा करण्याचे कंत्राट बंद केले असून गेल्या दोन वर्षांत पालिकेचेच कर्मचारी सोपो कर गोळा करतात. मात्र, सोपो कर गोळा करणारे सर्व कर्मचारी रोजंदारीवर काम करणारे असल्यामुळे गोळा होणार्‍या सोपो करात प्रामाणिकता राहत नसल्याचा आरोप काही नगरसेवकच करायला लागले आहेत. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात असलेल्या फिरत्या गाडेवाल्यांकडून सोपो कर गोळा केला जातो. मात्र, त्यांना त्या बाबत रसीट दिली जात नसल्याच्या तक्रारी पालिकेच्या अधिकार्‍यांकडेही पोहचलेल्या आहेत. पालिका क्षेत्रात तीस हलते गाडेवाले व्यापार करतात. प्रत्येकाकडून दिवसाला पन्नास रुपये सोपो कर आकारला जातो. या फिरत्या गाडेवाल्यांकडून पालिकेच्या तिजोरीत महिन्याला चाळीस हजार रुपये व गावात फिरणार्‍या विक्रेत्यांकडून एकवीस हजार रुपये मिळून 61 हजार रुपये येणे अपेक्षित असले तरी यातील निम्मे पैसेही पालिकेच्या तिजोरीत जमा होत नाहीत असे पालिकेच्याच कर्मचार्‍यांचा आरोप आहे.हे पैसे कुणाच्या खिशात जातात हा शोधाचा विषय असला तरी पालिकेत हपापाचा माल गपापा अशीच स्थिती असल्याची कुजबुज आहे.