शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

सिगारेट प्या, नाहीतर इ-सिगारेट? तुमच्या शरीराचं ‘खोकडं’ होणारच.

By admin | Published: June 14, 2017 6:22 PM

- सिगारेट पिणाऱ्यांनो, लक्षात ठेवा, इ-सिगारेटही तेवढीच घातक.

- मयूर पठाडेसिगारेट सोडायचा आतापर्यंत तुम्ही किती वेळा प्रयत्न केला? - अगणित वेळा केला असेल. पण ती काही सुटत नाही असाच अनुभव तुम्हाला आला असेल. पण ही सवय सुटावी म्हणून त्याच्या पर्यायांचाही शोध तुम्ही घेतला असेल. काही वर्षांपूर्वी अशीच एक इ-सिगारेट बाजारात आली होती. इ-सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट. ही सिगारेट आरोग्याला हानीकारक नाही किंवा कमी हानीकारक आहे म्हणून तिचा खूप मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आला. पण खरंच ती तशी आहे?इ-सिगारेट म्हणजे खरं तर एक इलेक्ट्रॉनिक उपकरण. त्यात प्रॉपेलिन ग्लायकॉल, ग्लिसरीन आणि निकोटिन यांचं लिक्विड असतं. अर्थात प्रत्येक इ-सिगारेटमध्ये निकोटिन असतंच असं नाही, पण या इ-सिगारेटमधील लिक्विड तापल्यानंतर त्यातून धूर निघतो आणि नेहमीच्या सिगारेटसारखाच धूर त्यातून निघतो. तो तुम्हाला घशात घेताही येतो आणि सोडताही येतो. यासंदर्भात कनेक्टिकट युनिव्हर्सिटीत नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनाचा निष्कर्ष आश्चर्यकारक आहे. त्यांचं म्हणणं आहे, रेग्युलर सिगारेट आरोग्याला जितकी हानीकारक आहे, तितकीच हानीकारक ही इ-सिगारेटही आहे. अर्थात हा त्यांचा अंदाज आहे, पण तो बरोबर आहे, असावा असाही त्यांना विश्वास आहे, पण हे संशोधक ठामपणे त्याबाबत काही सांगत नाहीत, कारण हे संशोधन त्यांनी प्रत्यक्ष मानवावर केलेलं नाही.

या संशोधकांनी काय केलं?

 

त्यांनी एक नकली यकृत तयार केलं आणि त्यावर हे संशोधन केलं. त्यासाठी त्यांनी अंगठ्याच्या आकाराचं एक थ्री डी उपकरणही तयार केलं; जे वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक चाचण्या करू शकतं. फिल्टर्ड, अनफिल्टर्ड आणि इ सिगारेट अशा तिन्ही प्रकारच्या सिगारेटपासून यकृतावर काय परिणाम होतो यासंदर्भात त्यांनी वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या. त्यासाठी धुराचे पफही त्या नकली यकृतावर सोडण्यात आले. काय आढळलं संशोधनात?

 

रेग्युलर सिगारेटमुळे यकृताची, शरीराची जी हानी होते, साधारण तशीच आणि तेवढीच हानी इ-सिगारेटनंही होते असं संशोधकांना या प्रयोगात आढळून आलं. इ-सिगारेटमुळेही कॅन्सरचा तेवढाच धोका आहे हेही त्यांना दिसून आलं. मात्र हे संशोधन कितीही ‘खात्री’चं असलं आणि योग्य ती सारी काळजी घेऊन करण्यात आलेलं असलं तरी ते प्रयोगशाळेत केलेलं असल्यामुळे आणि माणसांवर त्याची प्रत्यक्ष चाचणी केलेली नसल्यामुळे त्याचे ठामठोक निष्कर्ष त्यांनी जाहीर केलेले नाहीत. मात्र इ-सिगारेटवाल्यांनाही ‘काळजी घ्या’ म्हणून धोक्याचा इशारा त्यांनी नक्कीच दिला आहे.