जयपूर : येथील इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याने रोजगार कल्पकतेनं कसा मिळवावा व स्वावलंबी कसं व्हावं, हे प्रयोग करून दाखवलं आहेत. अनेक जण इंजिनीअरिंगची पदवी घेऊन रोजगार शोधू लागतात. तरीही अनेक पालक मुलगा वा मुलगी इंजिनिअरच झाली पाहिजे, असा अनेकांचा अट्टहास असतो. ही कथा आहे दीपांशू जैन (२३) याची. त्यानं इंजिनीअर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात वेळ वाया न घालवता आतला आवाज ऐकला. त्याला स्वयंपाक करायला आवडत असे. त्यामुळे त्यानं खाद्यपदार्थांची हातगाडी सुरू केली. त्याचं नाव आहे ‘इंजिनिअर का ठेला.’ हा ठेला आहे लाल कोठी भागात. ‘इंजिनिअर का ठेला’ हे आगळं नाव अनेक ग्राहकांची पावलं तिथं हमखास वळतात. त्यात तरुण-तरुणींची संख्याही अधिक असते. समाजमाध्यमांवर सध्या त्याची व ठेल्याची छायाचित्रं फिरत आहेत.
इंजिनीअरच्या हातचे रुचकर पदार्थ खा
By admin | Published: June 08, 2017 12:36 AM