लुधियाना :एका १६ वर्षीय मुलाने एका ९ वर्र्षाच्या मुलाला ठार मारून मृतदेहाचे सहा तुकडे केले आणि त्याचे रक्त पिऊन मांसही खाल्ले. आरोपी मुलास अटक झाली आहे. दीपू कुमार असे मृत मुलाचे नाव आहे. तो सोमवारपासून बेपत्ता होता. लुधियानातील दुग्री भागात त्याचा शिर कापलेला मृतदेह आढळून आला. आरोपी आणि बळी गेलेला मुलगा हे दोघेही स्थलांतरित मजुरांची मुले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आठवीत शिकतो. हे कृत्य केल्यानंतर तो सामान्य मुलांसारखा घरी आला. त्याची आई चंदीगडला गेलेली असल्यामुळे त्याने आपल्या वडिलांसाठी जेवणही तयार केले. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीनंतर हा प्रकार उजेडात आला. दीपू हा आरोपी मुलासोबत असल्याचे फुटेजमध्ये दिसले. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने दीपूची हत्या केल्याचे, तसेच त्याचे रक्त पिऊन मांस खाल्ल्याचे कबूल केले. (वृत्तसंस्था)त्याला स्वत:चेच हात-पाय खावेसे वाटायचे!पोलीस उपायुक्त भूपिंदर सिंग यांनी सांगितले की, हा नरभक्षणाचा प्रकार आहे. आपल्याला मानवी मांस खाण्याची तीव्र इच्छा होती, असे आरोपी मुलाने पोलिसांना सांगितले. आपणास नेहमी कच्चे चिकन खाण्याची इच्छा व्हायची, कधी कधी आपले स्वत:चे हातपाय खावेसे वाटायचे, असेही त्याने सांगितले.
लहान मुलाला ठार करून मांस खाल्ले
By admin | Published: January 22, 2017 12:34 AM