नवी दिल्ली : वय लपविण्यासाठी खर्चाची पर्वा न करता वाटेल ते करणाऱ्या लोकांना आता नसता खटाटोप करण्याची गरज उरणार नाही. वाढत्या वयाचा खुणा नाहीशा करण्यासाठी असा नवा उपाय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. यावर नामी उपाय आहे तो बटाटे खाण्याचा. नेहमी खातो त्यापेक्षा हे बटाटे वेगळे आहेत. हे बटाटे खाल्ल्याने वाढत्या वयाच्या खुणा नाहीशा होतात. शिवाय रोगांपासूनही बचाव होतो. या बटाट्यांचा रंग काहीसा जांभळा असून हे वाण विकसित करण्यासाठी पाच वर्षे लागली. ते काहीसे रताळ्यासारखे दिसतात. कृषी शास्त्रज्ञांनी या बटाट्यांचे २० नवीन वाण विकसित केले आहेत. यात सी जीवनसत्त्वाचे प्रमाण तीन पट अधिक असून आॅक्सिकरण रोधक तत्त्वामुळे वृद्धत्त्वाची प्रक्रियाही थांबते. रोगांपासून बचाव करण्यासाठी सुरुवातीला हा बटाटा टेस्ट ट्यूबमध्ये विकसित केला जातो. नंतर शेतात लागवड केली जाते. आरारुटचे प्रमाण खूप कमी असल्याने रंग जांभळा झाला आहे. शिजवल्यानंतरही जांभळा रंग कायम राहतो.
हे बटाटे खा अन् रहा सदा तरुण..
By admin | Published: April 07, 2017 5:00 AM