लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे खासदार रमेश विधुरी यांच्याविरुद्ध लवकरच लोकसभा अध्यक्षांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. भाजपनेही विधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून १५ दिवसांत त्यांच्या वक्तव्याबाबत उत्तर मागवले आहे.
विधुरी यांनी लोकसभेत बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. त्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाने लवकरात लवकर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. शुक्रवारीही लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी विधुरी यांना कठोर शब्दांत इशारा दिला होता. लोकसभेतील सत्ताधारी पक्षाचे नेते, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनीही ‘एक्स’वर कबीर यांचा ‘ऐसी वाणी बोलिए जो ओरन को सुंदर लगे’ हा दोहा पोस्ट केला आहे.
ही होऊ शकते कारवाईn रमेश विधुरी यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल काही दिवसांसाठी निलंबित केले जाऊ शकते. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. n भाजपने रमेश विधुरी यांना कारणे नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत त्यांच्याकडून उत्तर मागितले असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास भाजप त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करील, असे म्हटले आहे.
दानिश अली यांच्या अशोभनीय वर्तनाचीही चौकशी करा : खा. दुबेदानिश अली यांचे अशोभनीय वर्तन आणि टिकाटिप्पणी यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप खा. निशिकांत दुबे यांनी शनिवारी लोकसभाध्यक्षांकडे केली. दुबे यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, विधुरी यांच्या भाषणादरम्यान दानिश यांनी अडथळे आणले तसेच पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरून अशोभनीय टिकाटिप्पणी केली. विधुरी यांना चिथावणी देण्यासाठीच हा प्रकार अली यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या वर्तनाचीही चौकशी व्हायला हवी. विरोधी पक्षांच्या इतरही काही सदस्यांनी अशोभनीय टिकाटिप्पण्या केल्या.
काय म्हणाले होते खा. रमेश विधुरी?गुरुवारी लोकसभेतील चर्चेदरम्यान खा. रमेश विधुरी यांनी बसपचे खासदार दानिश अली यांना ‘दहशतवादी’ संबोधल्यानंतर व अपशब्द वापरल्यानंतर त्याची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.