तेलंगणा विधानसभेचे निकाल समोर आले असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस ६७ तर बीआसएस ३६ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस सत्तास्थापनेच्या जवळ पोहोचली आहे. तेलंगणात काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष ए रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन सुरू असून आज तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार आणि अतिरिक्त डीजी संजय कुमार जैन यांनीही रेड्डी यांची भेट घेऊन अभिनंदन केल्याचे फोटो समोर आले आहेत, यावरुन केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने अंजनी कुमार, महासंचालक यांना निलंबित केले आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.
"जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी"! 3 राज्यांतील भाजप विजयानंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया
भारतीय निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना आदर्श आचारसंहिता आणि संबंधित आचार नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केले आहे.
काँग्रेसने तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची दशकभराची सत्ता उलथून टाकली आहे. काँग्रेस ६६ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समिती ३७ जागांवर आघाडीवर आहे. भाजप १० जागांवर आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेससाठी हा महत्त्वाचा विजय आहे.
या विजयाने दक्षिणेत काँग्रेससाठी आणखी एक द्वार उघडले आहे. यामुळे आता काँग्रेसला आंध्रप्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीतही आघाडी घेऊ शकते असं बोलले जात आहे. यामुळे दक्षिणेत काँग्रेस मजबूत होईल. कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशात एक किंवा दोन नंबरला असू शकते.