Haryana Election New Date : हरियाणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (31 ऑगस्ट) महत्त्वाचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने हरियाणातील मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत. नवीन तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली असून, हरियाणाबरोबर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलण्यात आली आहे. (haryana assembly election 2024 new dates)
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. हरियाणामध्ये होणारे सण-उत्सव लक्षात घेऊन तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हरियाणाध्ये मतदान कधी होणार?
बिश्नोई समुदाय गुरू जम्बेश्वर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आसोज अमावस्या उत्सव साजरा करतो. बिश्नोई मतदानाचा अधिकार आणि परंपरेचा आदर राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हरियाणामध्ये आता ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
९० जागांसाठी निवडणूक
९० जागांसाठी हरियाणा विधानसभेची निवडणूक होत आहे. एकाच टप्प्यात राज्यात मतदान होणार असून, निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबरला मतदान होणार असल्याचे आधी जाहीर केले होते. आता तारीख बदलून ५ ऑक्टोबर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाणार होता. आता ८ ऑक्टोबर रोजी हरियाणा आणि जम्म काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.