NITI Aayog latest update: "केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र मिळून काम करणं आवश्यक आहे. आर्थिक प्रगतसाठी सरकारला खासगी क्षेत्रांचा सन्मान करायला हवा आणि त्यांना योग्य प्रतिनिधीत्वही द्यायला हवं," असं मत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. आर्थिक वाढ मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना एकत्रित काम करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी जुने कायदे रद्द करणं आणि व्यावसायासाठी व्यवस्था अधिक सोपी करण्याची गरज असल्यावर जोर दिला. नीति आयोगाच्या संचालन परिषदेला संबोधित करताना त्यांनी यावर भाष्य केलं. यावेळी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्रालाही सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेत सहभागी होण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं गेलं पाहिजे असं म्हटलं. "केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र मिळून काम करणं आवश्यक आहे. आर्थिक प्रगतीसाठी सरकारला खासगी क्षेत्रांचा सन्मान करायला हवा आणि त्यांना योग्य प्रतिनिधीत्वही द्यायला हवं. यावेळी ज्याप्रकारे अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात आलं त्यावर देश विकासाच्या मार्गावर तेजीनं पुढे जाऊ इच्छित असल्याचे संकेत आहेत," असं मोदी म्हणाले. सरकारच्या प्रयत्नांमुळे राष्ट्र निर्मितीच्या आवश्यक कामांसाठी प्रत्येकाला आपलं योगदान देण्याची संधी मिळेल असंही ते म्हणाले.
आर्थिक विकासासाठी सरकारला खासगी क्षेत्राचा सन्मान करत प्रतिनिधीत्व देणं आवश्यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 3:35 PM
NITI Aayog latest update: केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र मिळून काम करणं आवश्यक, पंतप्रधानांचं वक्तव्य
ठळक मुद्देकेंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र मिळून काम करणं आवश्यक, पंतप्रधानांचं वक्तव्यखासगी क्षेत्रालाही सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेत सहभागी होण्यासाठी पूर्ण सहकार्य आवश्यक : पंतप्रधान