नवी दिल्ली, दि. 18 - तीन वर्षापूर्वी पंतप्रधानपदी विराजमान झेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात भारताच्या आर्थिक सुधारणांवर जास्त भर दिल्याचे अमेरिकेतील प्रमुख विचारवंत आणि ज्येष्ठ अभ्यासक चेअर रिचर्ड एम रोसोने यांनी सांगितले आहे. भारताच्या आर्थिक विकासामध्ये त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांनाही मागे टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. पंतप्रपधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात 37 क्षेत्रात मोठी सुधारणा केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या सहा वर्षाच्या कार्यकाळात 29 क्षेत्रात सुधारणा झाली होती. तर डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात 19 तर दुसऱ्या कार्यकाळात 18 क्षेत्रात सुधारणा झाली आहे.
बाह्य घटक आणि भारतातील विदेशी गुंतवणूक चालना मिळाली आहे. परकीय गुंतवणुकीला सरकारने केलेल्या सुधारणा आणि खुले केलेले धोरण, यामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळून यात वाढ झाली आहे. यामुळे विदेशात परदेशी गुंतवणुकीला प्रोसाहन मिळालेय. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली असल्याचे अमेरिका-भारत धोरण तसेच अमेरिकेच्या थिंक टँक विचार केंद्र वाधवानी चेअर रिचर्ड एम रोसोने यांनी आपल्या अभ्यासातून असे म्हटले आहे.
रोसोने यांनी असेही म्हटले आहे की, गेल्या 25 वर्षांच्या कालावधीत भारतात झालेली विदेशी गुंतवणूक ही 1990 च्या दशकाच्या सुरुवातीचा विचार करता अधिक आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात नजर टाकली तर भारतात अलीकडे थेट विदेशी गुंतवणूक जलद गतीने झाली आहे. आधीच्या अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या कालावधीपेक्षा ती जास्त आहे. भारतात परदेशी गुंतवणूक सरकारी आधारभूत धोरणामुळे वाढली आहे.