नवी दिल्ली - हवामान बदलामुळे २०७० पर्यंत भारताच्या सकळ उत्पन्नाचे (जीडीपी) २४.७ कमी उत्पन्न असलेल्या कमजोर टक्के नुकसान होईल, असे अर्थव्यवस्थांना याचा सर्वाधिक आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) फटका बसेल. हवामान बदलाचा एका अहवालात म्हटले आहे. त्या सध्याचा वेग असाच कायम राहिला तुलनेत आशिया-प्रशांत क्षेत्रातील तर २०७० पर्यंत या क्षेत्रातील नुकसान कमी म्हणजेच १६.९ टक्केच सागर किनाऱ्यांवरील ३० कोटी लोकांना जलस्तरवाढीचा फटका असेल, असेही अहवालात नमूद बसेल. दरवर्षी अब्जावधी डॉलरच्या करण्यात आले आहे. संपत्तीचे नुकसान होईल.
एडीबीने 'आशिया-प्रशांत हवामान अहवाल' जारी केला आहे. अहवालाच्या पहिल्या अंकानुसार, हवामान बदलामुळे सागरी पातळीत वाढ होईल तसेच श्रम उत्पादकता घटेल. या दोन घटकांमुळे आशिया- प्रशांत क्षेत्रात सर्वाधिक नुकसान होईल. एडीबीचे अध्यक्ष मसत्सुगु असाकावा यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे उष्णकटिबंधीय वादळे, उष्ण लाटा आणि पूर यामुळे होणाऱ्या हानीत मोठी वाढ झाली आहे. त्यातून अभूतपूर्व आर्थिक आव्हाने आणि मानवीय संकट वाढले आहे.
हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. विकसनशील देशांसाठी कमी खर्चात हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी कसे करावे, याबाबत शिफारशी आहेत. - मसत्सुगु असाकावा, अध्यक्ष एडीबी