ईडीची पुन्हा PFI विरोधात कारवाई! केरळमध्ये छापा, चार जिल्ह्यात शोधमोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 10:41 AM2023-09-25T10:41:51+5:302023-09-25T10:53:45+5:30
केरळमध्ये ईडीने पीएफआयविरोधात पुन्हा कारवाई सुरू केली आहे.
ईडीने पुन्हा एकदा पीएफआय विरोधात कारवाई केली आहे. ईडीने केरळमधील माजी पीएफआय कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकले आहेत. ईडीने त्रिशूर, एर्नाकुलम, मलप्पुरम आणि वायनाडसह चार जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. अजुनही छापेमारी सुरू आहे.
PM मोदी आज जयपूरमध्ये जाहीर सभा घेणार, पहिल्यांदाच महिला सभेची व्यवस्था सांभाळणार
ऑगस्टमध्ये एनआयएने मलप्पुरममधील अनेक पीएफआय कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकले होते. वेंगारा येथील थायिल हमजा, तिरूरमधील कलाथिपरंबिल याहुती, तनूरमधील हनीफा आणि रंगत्तूर पडिक्कपरंबिल जाफर यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले, हे सर्व प्रतिबंधित पीएफआयशी संबंधीत होते.
एनआयएने म्हटले होते की, पीएफआय आणि त्यांच्या आघाडीच्या संघटनांद्वारे मंजेरी केंद्राचा वापर शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली केला जात आहे. यापूर्वी ईडी आणि राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि राज्य पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने १० राज्यांमध्ये छापे टाकून १०० हून अधिक पीएफआय नेत्यांना अटक केली होती. "दहशतवादाला निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि लोकांना प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनवणे" यात गुंतलेल्या व्यक्तींच्या निवासी आणि अधिकृत आवारात झडती घेण्यात आली.
१० राज्यांमध्ये मोठ्या कारवाईत, NIA, ED आणि राज्य पोलिसांनी PFI च्या १०० हून अधिक जणांना अटक केली. तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि अनेक राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. एनआयएने या महिन्याच्या सुरुवातीला पीएफआय प्रकरणात तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये ४० ठिकाणी छापे टाकले आणि चार जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर ईडीने तेलंगणातील ३८ ठिकाणी, हैदराबादमध्ये चार, जगत्यालमध्ये सात, निर्मलमध्ये दोन, आदिलाबाद आणि करीमनगर जिल्ह्यात आणि आंध्र प्रदेशातील दोन ठिकाणी शोध घेतला होता.