नवी दिल्ली : तामिळनाडूमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. के. अलगिरी यांचा मुलगा दयानिधी अलगिरी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली आहे.
दयानिधी अलगिरी यांच्याकडून सक्तवसुली संचालनालयाने 40 कोटीहून अधिक किंमतीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अवैध खाण प्रकरणी दयानिधी अलगिरी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालयाने याआधी ही अशाप्रकारची कारवाई केली होती. 2017 मध्ये सक्तवसुली संचालनालयाने अवैध खाण प्रकरणी 200 हून अधिक कोटींची संपत्ती जप्त केली होती.
दरम्यान, एम. के. अलगिरी यांना काही वर्षींपूर्वी द्रमुक पक्षातून निलंबित केले होते. पक्षाविरोधी काम केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी द्रमुकच्या मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात म्हटले होते, की एम. के. अलगिरी आणि त्यांचे समर्थक पक्षाविरोधी काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
द्रमुकचे सरचिटणीस के. अंबाझगन यांनी हे पत्रक काढले होते. विशेष म्हणजे एम. के. अलगिरी करुणानिधी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत.