शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

Money Laundering Case: कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 9:54 AM

Karti Chidambaram : आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :  आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) यांचा मुलगा कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांची 11 लाख 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या चार मालमत्तेपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे, असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम हे तामिळनाडूमधील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. त्यांना सीबीआय आणि ईडी या दोन्हींकडून आयएनएक्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. ईडीने 2017 मध्ये आयएनएक्स मीडिया ग्रुपला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची मंजुरी देण्यात कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी पीएमएलएअंतर्गत फौजदारी खटला नोंदवला होता.

काय आहे प्रकरण? हे प्रकरण आयएनएक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून मिळालेल्या कथित अवैध पैशाशी संबंधित आहे. याप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. लंडनहून चेन्नई विमानतळावर परत येताच कार्ती चिदंबरम यांनाअटक करण्यात आली. या प्रकरणी कार्ती यांच्यावर  गुन्हा दाखल झाला होता. आयएनएक्स मीडियामध्ये 2007 साली 300 कोटींची परकीय गुंतवणूक गैरपद्धतीने आणण्यासाठी कार्ती चिदंबरम यांनी साडेतीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात म्हणजे पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्रीपदी असताना हा प्रकार घडला होता. 

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरमEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय