लोकसभा निवडणूक 2024 आणि विरोधकांच्या ऐक्यासंदर्भात देशभरात चर्चा सुरू असतानाच, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मलिक यांनी ट्विट करत, "मी सर्व नेत्यांना सांगत आहे की, आपल्याला ईडी आणि सीबीआयला घाबरण्याची गरज नाही. सत्याचा सामना करा. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव निश्चित आहे. आगामी निवडणुकीत भाजप सरकार टिकणार नाही. नंतर, मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करा."
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले, केंद्र सरकारच्या एजन्सींना धैर्याने सामना करा. सहा महिन्यांनंतर त्यांचा पराभव निश्चित आहे. अधिकाऱ्यांनाही वाटेल काही करण्याची गरज नाही. यानंतर, सत्तेत बसलेल्या भाजपच्या लोकांचीच चौकशी होईल. प्रसारमाध्यमांनी कोणाची चौकशी, असा प्रश्न केला असता, मलिक यांनी पंतप्रधान मोदी आणि त्याचे सहकारी, असे उत्तर दिले.
भाजपला हरवण्यासाठी मतदान करा- दोन दिवसांपूर्वी हरियाणातील सांपला येथील छोटूराम संग्रहालयात आयोजित किसान कमेरा महापंचायतीत बोलताना ते म्हणाले, भाजपला हरवणाऱ्यांना मतदान करा. यासाठी मीही प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर गुरनाम चढूनी यांनीही 2024 मध्ये निवडणूक लढण्याची रणनीती आखण्याचे आवाहन केले आहे.