ईडी संचालक नियुक्ती प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. गृहमंत्री शाह म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आनंद व्यक्त करणारे लोक, अनेक कारणांमुळे भ्रमात आहेत. ते म्हणाले, ईडी एक अशी संस्था आहे, जी कुण्या एका व्यक्तीवर अवलंबून नसते. यामुळे, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक कोण आहेत? हे महत्वाचे नाही.
गृहमंत्र्यांनी ट्विट केले की, सीव्हीसी कायद्यातील दुरुस्ती, जी संसदेने रीतसरपणे मंजूर केली होती, ती कायम ठेवण्यात आली आहे. ईडीचे स्थान कुण्याही एका व्यक्तीपेक्षा वरचे आहे आणि हिचा मुख्य उद्देश मनीलॉन्ड्रिंग आणि परकीय चलन कायद्याच्या उल्लंघनाची चौकशी करणे, असा आहे. यामुळे पुढे ईडी संचालक कोण असतील, हे महत्वाचे नाही. कारण जी व्यक्ती या पदावर बसेल, ती विकासाविरोध मानसिकता असलेल्या घराणेशाहीच्या आरामदायक क्लबच्या भ्रष्टाचारावर लक्ष देईल.
दरम्यान, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह विरोधी पक्षांच्या अेनक नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केंद्र सरकारसाठी मोठा झटका असल्याचे म्हटले होते. कांग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सरकारला चपराक आहे. तसेच, AAP नेते तथा दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही सर्वोच्च न्ययालयाचा निकाल म्हणजे, सरकारसाठी नल्ला असल्याचे म्हटले आहेत.
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ईडीचे विद्यमान संचालक संजय मिश्रा यांचे एक्सटेन्शन अवैध ठहरवत 31 जुलैपर्यंत निवृत्त होण्याचे आदेश दिले आहेत.