नवी दिल्ली : ब्राझीलमधील प्रांतीय गव्हर्नरने पैशांची अफरातफर करून ५३ देशांना ते पाठवल्याच्या आरोपावरून त्यांच्या १६१ दशलक्षांच्या (चलनाचा उल्लेख नाही) व्यवहारांची ब्राझीलचे अधिकारी तपास करत आहेत. ही माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली उच्च न्यायालयाला दिली. ईडीने भारतातील वेगवेगळ््या व्यक्ती आणि संस्थांची ६७ बँक खाती गोठवून ठेवल्याचे ही माहिती देऊन समर्थन केले.हॅमिल्टन हाऊसवेअर्सने दाखल केलेल्या याचिकेवर ईडीने आपले म्हणणे मांडले. कंपनीचे वकील विजय अग्रवाल यांनी कंपनीची बँक खाती ईडीने गोठवून ठेवल्याचा युक्तिवाद केला.अग्रवाल यांनी न्यायालयाला सांगितले की, कंपनीला (हॅमिल्टन) गेल्या फेब्रुवारी महिन्यात तिच्या बँकेने असे कळवले की, पनामातून कंपनीला मिळालेले २२ लाख रूपये चौकशी संस्थांच्या नजरेखाली आहेत. अग्रवाल यांनी असे म्हटले की, यावर्षी जुलै महिन्यात बँकेने कंपनीला असे कळवले की ईडीने केलेल्या विनंतीवरून तिची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.ते म्हणाले, कंपनीने ईडीला २२ लाख रुपये मुदतठेव म्हणून ठेवा पण बँक खाती खुली करा म्हणजे व्यवहार करता येईल अशी लेखी विनंती अनेकवेळा केली.
ईडीने गोठवली व्यक्ती, संस्थांची ६७ बँक खाती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 2:38 AM