शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

झटपट कर्ज अन् ग्राहकांना ताप; पेटीएमसह इतर ॲप्सवर ईडीचा दंडुका; १०६ कोटी रुपये जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 9:45 AM

चिनी उद्योगपतींचे नियंत्रण असलेल्या या मोबाइल ॲपवर झटपट ऑनलाइन कर्ज देऊन लोकांना त्रास दिल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोबाइल ॲपद्वारे झटपट कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर आपले जाळे फेकले आहे. कर्ज देऊन ग्राहकांना त्रास दिल्याचा आरोपप्रकरणी करण्यात आलेल्या तपासात या ॲप्सच्या बँक खात्यांमध्ये असलेली १०६ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

चिनी उद्योगपतींचे नियंत्रण असलेल्या या मोबाइल ॲपवर झटपट ऑनलाइन कर्ज देऊन लोकांना त्रास दिल्याचा आरोप आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडी त्यांची चौकशी करत आहे. ही कारवाई ईडीने रेझरपे, कॅशफ्री, पेटीएम, पेयू पेमेंट ॲप आणि ईझीबझसारख्या पेमेंट प्लॅटफॉर्मवर केली आहे. अलीकडेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने देशातील १३८ बेटिंग ॲप्स व ९४ कर्ज ॲप्स ब्लॉक केले होते. यापूर्वी सरकारने शेकडो चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे. या ॲप्सवर युजर्सच्या वैयक्तिक डेटाशी खेळल्याचा आरोप होता.

नातेवाईकांनाही धमकावले 

या ॲप्सनी अल्प मुदतीचे कर्ज देऊन उच्च प्रक्रिया शुल्क आणि अवाजवी दरांद्वारे लोकांचे नुकसान केले आहे. नंतर या कंपन्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांकडून फोनवरून धमकावून आणि मानसिक छळ करून पैशांची मागणी केली. ईडीचे म्हणणे आहे की, या ॲप्सने विविध बँकांमध्ये तयार केलेल्या खात्यांसह मर्चंट आयडीद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंग केले. हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते.

फसवणूक करून कंपन्यांची स्थापना

चीनच्या उद्योगपतींनी बनावट संचालक नेमून या कंपन्या स्थापन केल्याचे तपास संस्थेने म्हटले आहे. या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून, त्यांना संचालक म्हणून नियुक्त केले. त्याच्या पूर्व संमतीशिवाय त्याच्या नावाने बँक खातीही उघडण्यात आली. ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे ॲप्लिकेशन्सवरून अल्प रकमेसाठी कर्ज झटपट वितरित केले गेले. ते परत घेण्यासाठी गुंडांकडून त्रास देण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

या कंपन्यांवर आरोप

फसवणूक करणाऱ्या या संस्थांमध्ये चिनी नागरिक आणि उद्योगपतींच्या नियंत्रणाखाली असलेल्या तीन फिनटेक कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये मॅड एलिफंट नेटवर्क टेक्नॉलॉजी, बॅरोनिक्स टेक्नॉलॉजी आणि क्लाउड ॲटलस फ्युचर टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.

पेमेंट ॲप्सद्वारे रिअल टाइम व्यवहारांत कोण पुढे?

    भारत     २,८७५    चीन     २,१७५    द. कोरिया     ९१०     थायलंड     ८२५     इंग्लंड     ४५०वर्ष २०२२ चे आकडे, रक्कम कोटी रुपयांमध्ये

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसMobileमोबाइल