काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचे नाव 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट' संबंधित खटल्याच्या आरोपपत्रात नोंदवण्यात आले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची मुलगी प्रियंका गांधी वाड्रा यांनी दिल्लीस्थित रिअल इस्टेट एजंटच्या माध्यमातून हरियाणात जमीन खरेदी केल्याचे ईडी'ने म्हटले आहे. या एजंटने एनआरआय व्यावसायिक सीसी थंपी यांनाही जमीन विकली.
डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचे निधन; चेन्नईतील एमआयओटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
ईडीचे म्हणणे आहे की, वाड्रा आणि थंपी यांचे दीर्घ संबंध आहेत आणि समान व्यवसाय करण्याव्यतिरिक्त दोघेही अनेक गोष्टी एकत्र करतात. हा एक मोठा खटला आहे, जो फरारी शस्त्र विक्रेता संजय भंडारीशी संबंधित आहे. मनी लाँड्रिंग, परकीय चलन आणि काळ्या पैशाचे कायदे आणि अधिकृत गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भंडारी यांची अनेक एजन्सीमार्फत चौकशी केली जात आहे. तपास यंत्रणांच्या भीतीने तो भारत सोडून २०१६ मध्येच ब्रिटनला पळून गेला होता.
थंपी आणि ब्रिटिश नागरिक सुमित चड्ढा यांच्यावर भंडारीला गुन्ह्यातील रक्कम लपवण्यात मदत केल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणाशी संबंधित आधीच्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा हे थंपीचे जवळचे सहकारी म्हणून नाव दिले आहे. मात्र न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अधिकृत दस्तऐवजात प्रियंका गांधी यांच्या नावाचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एचएल पाहवा यांनी वाड्रा आणि थंपी या दोघांना जमिनी विकल्याचा आरोप तपास यंत्रणेने आरोपपत्रात केला आहे. हरियाणात जमीन खरेदी करण्यासाठी त्यांना बेनामी पैसे देण्यात आले होते आणि वाड्रा यांनी जमीन विक्रीसाठी पूर्ण रक्कम दिली नाही.
पाहवा यांनी २००६ मध्ये प्रियंका गांधी यांना शेतजमीन विकली आणि त्यानंतर २०१० मध्ये ती त्यांच्याकडून परत विकत घेतली. रॉबर्ट आणि प्रियांका यांचे नाव आरोपी म्हणून दिलेले नाही. पण थंपी आणि वाड्रा यांच्यातील संबंध दाखवण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीचा उल्लेख आहे.