शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

56000 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यात उद्योगपती मित्तलसह 5 जणांना अटक, ED ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 2:44 PM

याप्रकरणी आतापर्यंक कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Bank Fraud News:अंमलबजावणी संचालनालय(ED)ने सुमारे 56000 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करत प्रमुख पाच आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण भूषण स्टील लिमिटेड (BSL) कंपनीशी संबंधित आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 12 जानेवारी रोजी विशेष ईडी न्यायालयात हजर केले जाणार असून, चौकशीसाठी ईडी आरोपींच्या रिमांडची मागणी करणार आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये कंपनीचे माजी उपाध्यक्ष(बँकिंग) पंकज कुमार तिवारी, माजी उपाध्यक्ष(अकाउंट) पंकज कुमार अग्रवाल, माजी मुख्य वित्तीय अधिकारी नितीन जोहरी, माजी प्रवर्तक नीरज सिंगल आणि त्यांचा मेहूणा अजय मित्तलसह त्यांची पत्नी अर्चना मित्तल यांचा समावेश आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, भूषण स्टील लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंगल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक शेल कंपन्या स्थापन केल्या आणि बीएसएलशी जोडलेल्या प्रवर्तक आणि संस्थांनी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीकडे बँकेचा निधी फिरवला. यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेत सादर करुन LCs (लेटर ऑफ क्रेडिट) मध्ये सूट मिळवण्यासाठी फसवी निवेदने दिली. तसेच, चुकीच्या पद्धतीने निधी त्यांच्या स्वतःच्या कंपन्यांकडे वळवला. 

या प्रकरणी तपास यंत्रणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंघल आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांविरुद्ध सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणात तपास यंत्रणेने गेल्या वर्षी 13 ऑक्टोबर 2023 मध्ये राजधानी दिल्ली, हरियाणा, कोलकाता, मुंबई, भुवनेश्वर इत्यादी अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली होती.

4 कोटींच्या महागड्या कारसह 72 लाख रुपयांची रोकड जप्तनीरज सिंघल यांना ED ने गेल्या वर्षी 09 जून 2023 रोजी अटक केली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तपासादरम्यान सापडलेले सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबानंतर तपास यंत्रणेने अनेक जंगम आणि जंगम मालमत्ताही जप्त केल्या आहेत. आसाम, रायगड, फरिदाबाद, हरियाणा येथे कंपनीशी संबंधित सुमारे 61.38 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आज त्याचे बाजार मूल्य अनेक पटींनी जास्त मानले जाते. 

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय