नवी दिल्ली : बेकायदा खाणींच्या प्रकरणाबाबत समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव यांच्यामागे मोदी सरकारने चौकशीचा ससेमिरा मागे लावलेला आहे. आता बसपाच्या प्रमुख मायावती यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत स्मारके उभारताना झालेल्या कथित घोटाळ््याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी काही ठिकाणी धाडी घातल्या.आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला वगळून सपा व बसपाने उत्तर प्रदेशमध्ये युती केली आहे. त्यामुळेच तर अखिलेश व मायावतींवर मोदी सरकारने आकसाने कारवाई सुरू केली नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मायावती मुख्यमंत्री असताना स्मारकांच्या बांधणीसाठी २६०० कोटी रुपये खर्च केले होते.१०० जणांवर गुन्हेउत्तर प्रदेश राजकीय निर्माण निगम, सार्वजनिक बांधकाम खाते, नवीन ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण यातील १०० अभियंत्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्मारकबांधणी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीचे धाडसत्र; मायावतींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 6:13 AM