जोधपूर - राजस्थानात राजकीय संघर्ष सुरू असतानाच, आज अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे मोठे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी ईडीचा चमू पीपीई किट घालून येथे पोहोचला. सध्या ईडीचे अधिकारी येथे दस्तऐवजांची तपासणी करत आहेत. हा चमू सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अग्रसेन गेहलोत यांच्या येथील मंडोर पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या घरी पोहोचला. यापूर्वी गैहलोतांच्या निकटवर्तीय काँग्रेस नेत्यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली होती.
अनेक राज्यांत ईडीची छापेमारी सुरू -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इडिने अनेक राज्यांत छापेमारी सुरू केली आहे. फर्टिलायझर स्कॅमप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. याअंतर्गत राजस्थानसह गुजरात, पश्चिम बंगाल आणि मुंबईमध्येही ईडीकडून छापेमारी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नसुरा, मुख्यमंत्री गेहलोतचांचे निकटवर्तीय जोधपूर येथील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी खासदार बद्रीराम जाखड यांच्या निवासस्थानावरही ईडीचा चमू पोहोचला आहे.
संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह पोहोचला ईडीचा चमू -ईडीचा चमू संपूर्म सुरक्षा व्यवस्थेसह सीएम गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या ठिकानांवर पोहोचला. ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्या मंडोर येथील घराशिवाय त्यांचे पाटवा येथील कार्यालय आणि दुकानावरही तपास सुरू केला आहे. कारवाईदरम्यान केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.
अनुपम कृषि फर्टिलायझर नावाने पावटा येथे अग्रसेन गहलोत यांचे कार्यालय आणि दुकान आहे. हे कार्यालय आणि दुकान 1980 च्याही पूर्वीपासून आहे. हेच कार्यालय गेहलोत यांचे निवडणूक प्रचार कार्यालय राहत आहेल आहे. या दोन मजली दुकानाच्या, वरच्या मजल्यावर कार्यालय तयार करण्यात आले आहे. येथूनच मुख्यमंत्री गेहलोतांचे निवडणुकीसंदर्भातील सर्व कामे चालतात.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा!
'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?
आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस