दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवालअंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होण्यापूर्वीच, त्यांचे मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावरही ईडीने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास राजकुमार आनंद यांच्या सरकारी बंगल्यासह 9 ठिकानांवर ईडीचा चमू पोहोचला आणि तपासाला सुरुवात केली. मात्र, ही छापेमारी कशासंदर्भात करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राज कुमार आनंद हे दिल्ली सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री आहेत. याशिवाय त्यांच्याकडे, श्रम रोजगार, एससी-एसटी, गुरुद्वाराच्या निवडणुका, सहकारी संस्थांचे कामकाज आदी जबाबदाऱ्याही आहेत. राज कुमार आनंद यांच्या सिव्हिल लाइन्स भागातील घरासह अनेक ठिकाणांवर ईडीचे चमू पोहोचले आहेत. तसेच, त्यांच्या घराबाहेर आणि इतर ठिकाणांवरही निमलष्करी दलाचे अधिकारी तैनात राहिले.