मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी हे नाव आताशा सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. ईडीच्या स्थापनेला १७ वर्षे झाली. या संपूर्ण कालावधीत ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत आजवर ५,४२२ गुन्हे नोंदवले आहेत. मात्र, त्यापैकी अवघे २३ गुन्हेच सिद्ध करण्यात ईडी यशस्वी ठरली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा आकडा १,०४,७०२ कोटी रुपये एवढा आहे. जाणून घेऊ या ईडीचे प्रगतिपुस्तक...
असे आहे ईडीचे प्रगतिपुस्तक...
१/७/२००५ रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याने (पीएमएलए) ईडीला अधिक प्रभावी बनवले गेले.गैरव्यवहार झालेल्या मालमत्तांची जप्ती करण्याचे अधिकार ईडीला बहाल.पीएमएलए अंतर्गत १७ वर्षांत
५,४२२ गुन्ह्यांची नोंद.
या कायद्यांनी ईडी शक्तिमानदेशात होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांना पायबंद घालण्यासाठी १ मे १९५६ रोजी ईडीची स्थापना झाली.
१९९९ साली फेमा आणि नंतर १ जुलै २००५ रोजी पीएमएलए या दोन कायद्यांनी ईडीला अधिक शक्तिमान केले.
१७ पैकी १० वर्षांत परदेशी विनिमय चलन कायदा (फेमा) आणि पीएमएलए अंतर्गत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद.
फेमा अंतर्गत १,१८० तर पीएमएलए अंतर्गत ५,३१३ गुन्हे दाखल.
प्रकरणांचा आतापर्यंत तपास केलेल्या प्रकरणांची संख्या ३०,७१६
कारणे दाखवा नोटीस जारी केलेली प्रकरणे ८,१०९
नोटिशींपैकी ६४७२ प्रकरणांची पडताळणी.
८१३० रुपये दंडापोटी वसूल तर ७०८९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त.