शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

भाजपा पदाधिकाऱ्याशी वाद, ED चं २ शेतकऱ्यांना समन्स; राजकारण पेटलं, पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 11:20 AM

परंतु हा वाद ५ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांना जारी केलेल्या ईडी समन्समुळे उभा राहिला.

नवी दिल्ली - ED Summons to Farmers ( Marathi News ) ईडीच्या कारवायांवरून विरोधक सातत्याने सत्ताधारी भाजपावर निशाणा साधतात. सत्तेचा दुरुपयोग करून भाजपा विरोधकांच्या मागे ईडी लावते असा आरोप केला जातो. त्यातच आता तामिळनाडूत असे प्रकरण समोर आलंय ज्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील अट्टूर येथील २ शेतकऱ्यांना ईडीने समन्स पाठवले आहे. ज्यात तपास यंत्रणेने त्यांच्या जीताचा उल्लेख केल्याचाही आरोप आहे. हे प्रकरण सेलम जिल्ह्यातील अट्टूरमध्ये राहणारे दोन भाऊ कन्नैयन आणि कृष्णन यांच्याशी निगडीत आहे. 

काय आहे प्रकरण?एस कन्नैयन आणि त्यांचा भाऊ कृष्णन यांनी त्यांच्या शेताच्या चारीबाजूला बेकायदेशीर वीजेचे कुंपण घातले आहे. त्यामुळे २ भारतीय जंगली गव्यांचा मृत्यू झाला होता. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत त्या दोघांविरोधात २०१७ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.त्यानंतर कोर्टात या प्रकरणी २८ डिसेंबर २०२१ ला शेतकरी कृष्णन आणि कन्नैयन या दोघांना निर्दोष सोडले. परंतु या घटनेनंतर FIR चा आढावा घेत ईडीने तामिळनाडू वनविभागाच्या एका पत्राच्या आधारे मार्च २०२२ मध्ये या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली.

परंतु हा वाद ५ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांना जारी केलेल्या ईडी समन्समुळे उभा राहिला. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आले आहे. तामिळनाडूतील राजकीय पक्ष आणि समाजसेवकांनी ईडीने या दोन शेतकऱ्यांना समन्स पाठवले आहे. त्यात दोघांच्या जातीचा उल्लेख केला आहे त्यावर आक्षेप घेत विरोध केला आहे. या शेतकऱ्यांच्या वकिलाने दावा केलाय की, ईडीची ही कारवाई शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. कारण हे दोन शेतकरी स्थानिक भाजपा नेते गुनासेकरन यांच्याशी कायदेशीर लढा देत आहेत. वकिलांनी केवळ ईडीच्या हेतूवर संशय घेतला नाही तर त्यांनी पाठवलेल्या समन्सवर नाराजी व्यक्त करत ईडी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. 

काय आहे आरोप?कृष्णन यांनी सांगितले की, हे प्रकरण जमिनीचे खरे मालक आणि बनावट दस्तावेज यात आहे. गुनासेकरन यांच्याविरोधात कोर्टात अर्ज दाखल केला होता. आम्ही २०२० पासून यात कायदेशीर लढा देत आहोत. ईडीने आमच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली. गेल्या ४ वर्षापासून आम्ही शेती केली नाही. आमच्या बँक खात्यात केवळ ४५० रुपये आहेत. सरकारकडून वृद्ध व्यक्तींना देण्यात येणारे प्रतिमाह १ हजार रुपये आणि मोफत रेशन यावर आमचा उदर निर्वाह सुरू आहे. आमच्या जमिनीवर गुनासेकरन यांनी अवैध कब्जा केला आहे. 

दरम्यान या प्रकरणी एका आयआरएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांना पत्र पाठवून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेत्याशी कायदेशीर वादानंतर ईडीने सेलम जिल्ह्यातील २ गरीब शेतकऱ्यांना समन्स पाठवले. ७२ वर्षीय कन्नैयन आणि ६७ वर्षीय कृष्णन यांच्याकडे तामिळनाडूच्या अट्टर इथं साडे सहा एकर जमीन आहे. या जमिनीवरून भाजपाचे माजी जिल्हा सचिव गुनासेकरन यांच्याशी वाद सुरू आहे. या वादामुळे गेल्या ४ वर्षापासून या शेतकऱ्यांना शेती करता आली नाही. गुनासेकरन यांच्याविरोधात कृष्णन यांनी २०२० मध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यात त्यांना अटक होऊन न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा