Delhi Excise Policy Case: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अनेकदा चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर राहिले नाही. आता अखेर समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. ईडीने केजरीवालांविरोधात खटला चालवण्याची मागणी करणारी नवी तक्रार न्यायालयात दाखल केली आहे.
समन्स बजावूनही केजरीवाल हजर झाले नाहीतमीडिया रिपोर्टनुसार, अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट दिव्या मल्होत्रा यांनी गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत केजरीवालांना जारी करण्यात आलेल्या पहिल्या तीन समन्सवर हजर न राहिल्याबद्दल ईडीने यापूर्वी स्थानिक न्यायालयात केजरीवालांविरुद्ध खटला चालवण्याची याचिका दाखल केली होती.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या या आठही समन्सना बेकायदेशीर म्हटले होते आणि 12 मार्चनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी केली जाऊ शकते, असे ईडीला कळवले होते. आता ईडीने पुन्हा एकदा केजरीवालांविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. याबाबत उद्या काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे आहे.