शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 6:33 AM

हे तर केंद्रातील मोदी सरकारचे कारस्थान; काँग्रेसची खरमरीत टीका

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले आहे. राहुल गांधी यांनी आज, गुरुवारी (दि.२ जून) व सोनिया गांधी यांनी ८ जूनला ईडीच्या मध्य दिल्लीतील मुख्यालयात हजर राहावे असे या समन्समध्ये म्हटले आहे.

देशाची दिशाभूल करण्यासाठी केंद्र  सरकारने रचलेले हे कारस्थान आहे, अशी टीका काँग्रेसने समन्स प्रकरणावर केली आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य देतील. विदेश दौऱ्यावर असल्याने आपल्याला ५ जूननंतर चौकशीला बोलाविण्यात यावे असे पत्र राहुल गांधी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना लिहिले आहे. 

खरगे, बन्सल यांची आधीच चौकशी

नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचे मालक असलेल्या यंग इंडियन या संस्थेवर गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. तेथील मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीला सोनिया व राहुल गांधी यांचे जबाब नोंदवून घ्यायचे आहेत. नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून प्रसिद्ध केले जाते. या वृत्तपत्रातील गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, पवन बन्सल यांची ईडीने नुकतीच चौकशी केली होती. 

लोकशाहीवरील हल्ला : सुरजेवालाकाँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ईडीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठविलेले समन्स हे केंद्र सरकारच्या डावपेचांचा भाग आहे. या संकटावर काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळाच्या आधारे निश्चित मात करेल. लोकशाहीवरील हा हल्ला आम्ही परतवून लावू. 

सोनिया गांधी, राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर नॅशनल हेरॉल्डमधील आर्थिक व्यवहारांबाबत प्राप्तिकर खात्याने चौकशी केली. त्याची न्यायालयाने दखल घेतली होती. त्यानंतर ईडीने मनी लाँडरिंगविरोधी कायद्यानुसार नव्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी हे यंग इंडियनचे प्रवर्तक व समभागधारक आहेत.

‘गैरकृत्य केले नसेल तर चिंता कशाला’

केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविल्याने सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी चिंता करण्याचे कारण नाही. जर त्या दोघांनी काहीही चुकीचे कृत्य केले नसेल तर त्यांनी चिंता करू नये. काँग्रेस नेत्यांनी यावर संतप्त केला होता. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर किशन रेड्डी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नॅशनल हेरॉल्डसारख्या खोट्या प्रकरणांत गुन्हे दाखल करून मोदी सरकारच्या हाती काहीही लागणार नाही. या सरकारचे कारस्थान कदापिही यशस्वी होणार नाही.     - अभिषेक मनू सिंघवी 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय