शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

फारुख अब्दुल्ला यांना चौकशीसाठी ED ने पाठवले समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 9:04 PM

Money Laundering Case: फारुख अब्दुल्ला यांना ईडीने मंगळवारी सकाळी हजर राहण्यास सांगितले आहे.

ED Summons Farooq Abdullah: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात समन्स बजावले असून, मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. 

फारुख अब्दुल्ला यांच्यावर काय आरोप?आरोपपत्रात म्हटले आहे की, फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खेळाच्या विकासाच्या नावाखाली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतर लोकांकडून मिळालेला निधी इतरत्र वळवला आणि त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला. हा निधी अनेक खाजगी बँक खाती आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवण्यात आला. नंतर निधी आपापसात वाटून घेतला. 

किती कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप?2018 मध्ये ईडीने सीबीआयच्या आरोपपत्राच्या आधारे या प्रकरणात पीएमएलएची चौकशी सुरू केली. BCCI ने असोसिएशनला 112 कोटी रुपये दिले होते. त्यातून 43.6 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 2001 ते 2012 दरम्यान फारुख अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना हा कथित घोटाळा झाला होता.

गेल्या महिन्यातही समन्स पाठवण्यात आले होतेलोकसभेत श्रीनगरचे प्रतिनिधित्व करणारे 86 वर्षीय फारुख अब्दुल्ला यांना गेल्या महिन्यातही याच प्रकरणात तपास यंत्रणेने समन्स बजावले होते. त्यावेळी प्रकृतीचे कारण सांगून ते श्रीनगर येथील ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर फारुख अब्दुल्ला हे नवे विरोधी नेते आहेत, ज्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय