बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या जवळच्या नेत्यावर ईडीची टीम मोठी कारवाई करत आहे. आरजेडी नेते सुभाष यादव यांच्या घरासह अनेक ठिकाणी ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. वाळू माफियांशी संबंधित प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास सहाहून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली आहे. सुभाष यादव यांच्यावर बिहारमध्ये 14 खटले सुरू आहेत.
आरजेडी नेते सुभाष यादव हे फक्त माजी आमदारच नाहीत, तर गेल्या लोकसभा निवडणुकीत झारखंडमधील चतरा येथून उमेदवारही होते, परंतु ते निवडणुकीत पराभूत झाले होते. चतरा येथून आरजेडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे सुभाष प्रसाद यादव हे अफाट संपत्तीचे मालक आहेत. लालू यादव यांच्या ते अत्यंत जवळचे असल्याचं म्हटलं जात आहे.
पाटणा जिल्ह्यातील शाहपूर भागातील हेतनपूर गावचे रहिवासी असलेले 52 वर्षीय सुभाष प्रसाद यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू यादव यांच्या जवळचे असल्याचं सांगितलं जाते. ते ब्रॉडसन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतात. ईडीच्या रडारवर अनेक लोक आहेत ज्यांनी प्रचंड संपत्ती मिळवली आहे. यामध्ये शुक्रवारी आयकर विभागाने एका RJD नेत्याच्या ठिकाणांची तपासणी केली होती.
आयकर पथकाने RJD MLC विनोद जैस्वाल यांच्या परिसरात 6 तासांहून अधिक वेळ छापा टाकला. झडतीदरम्यान आयकर अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कागदपत्रांसह अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये विविध वित्तीय संस्थांमधील गुंतवणुकीव्यतिरिक्त अनेक ठिकाणच्या रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रांचाही समावेश आहे.