National Herald Case: शुक्रवारी नाही, तर सोमवारी होणार चौकशी; राहुल गांधींची मागणी ED कडून मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 10:44 PM2022-06-16T22:44:59+5:302022-06-16T22:45:28+5:30
National Herald Case: शुक्रवारी नाही, तर सोमवारी चौकशी करण्यात यावी अशी विनंती राहुल गांधी यांनी ईडीकडे केली होती.
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवस जवळपास तीस तास राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. पुढील चौकशीसाठी सोमवारपर्यंतची वेळ देण्यात यावी असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यांची ही मागणी ईडीनं मान्य केली असून आता पुढील चौकशी सोमवारी केली जाणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
राहुल गांधी यांची मागणी मान्य करत ईडीनं त्यांना नवं समन बजावलं आहे, तसंच सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. सक्तवसूली संचालनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २० जून रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या तपासाच्या चौकशीसाठी येण्यासाठी नवीन समन्स जारी केलं आणि त्यांची आई आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आजारपणाचा विचार करून संस्थेनं त्यांची विनंती मान्य केल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.
Enforcement Directorate today issued fresh summons to Congress leader Rahul Gandhi to join the investigation in the National Herald case on June 20, granting his request to the agency considering the illness of his mother and interim Congress president Sonia Gandhi: ED sources
— ANI (@ANI) June 16, 2022
बुधवारी त्यांना त्यांच्या यंग इंडियामधील हिस्स्याशी निगजीत डॉक्युमेंट्सच्या आधारावर प्रश्न विचारण्यात आले. ईडीद्वारे त्यांना जवळपास ३५ प्रश्न विचारण्यात आले. बुधवारी देखील ईडीनं त्यांनी जवळपास १० तास चौकशी केली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. यापूर्वीही पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.