National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवस जवळपास तीस तास राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. पुढील चौकशीसाठी सोमवारपर्यंतची वेळ देण्यात यावी असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यांची ही मागणी ईडीनं मान्य केली असून आता पुढील चौकशी सोमवारी केली जाणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
राहुल गांधी यांची मागणी मान्य करत ईडीनं त्यांना नवं समन बजावलं आहे, तसंच सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. सक्तवसूली संचालनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २० जून रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या तपासाच्या चौकशीसाठी येण्यासाठी नवीन समन्स जारी केलं आणि त्यांची आई आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आजारपणाचा विचार करून संस्थेनं त्यांची विनंती मान्य केल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.